मुलाचे लग्न जुळत नसल्याने तणावातून परचुरी येथील ५४ वर्षीय महिला बेपत्ता; संगमेश्वर पोलिसांत नोंद

Gramin Varta
800 Views

संगमेश्वर /एजाज पटेल : संगमेश्वर तालुक्यातील परचुरी वेद्रेवाडी येथील ५४ वर्षीय विवाहित महिला घरात कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात महिला नापत्ता झाल्याची रीतसर नोंद करण्यात आली असून पोलीस सर्व स्तरावर तिचा कसून शोध घेत आहेत.सौ. अंजनी अर्जुन वेद्रे वय ५४ वर्षे, असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.

संगमेश्वर पोलिसांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सौ. अंजनी वेद्रे यांच्या मुलाचा विवाह जुळत नसल्यामुळे त्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. याच विवंचनेतून दिनांक २६ जून २०२६ रोजी सकाळी ०९.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास, त्यांनी परचुरी येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेल्या. त्या घरी न दिसल्याने त्यांचे पती अर्जुन यशवंत वेद्रे व इतर नातेवाईकांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरात, गावात तसेच सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.

अखेर याप्रकरणी पती अर्जुन वेद्रे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी नापता  नोंद केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बिनतारी संदेश पाठवून याबाबत सतर्क केले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार अरुण .बी. वानरे हे डिंगणी दुपक्षेत्र अंतर्गत करीत आहेत.

सदर वर्णनाची महिला कोणास आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तपासिक अंमलदार ए.बी. वानरे यांच्या ७०३८१३९४९९ या क्रमांकावर किंवा संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी पती अर्जुन वेद्रे यांच्या ७७९६१०३७२१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस व कुटुंबियांतर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *