खेड : आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१ च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘लायन्स क्लब ऑफ खेड सिटी’च्या २०२६-२७ या नवीन वर्षासाठीच्या कार्यकारिणीचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच भरणे जोगळे मल्टिपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ला. अविनाश (अनित अनंत) दळवी यांची अध्यक्षपदी, ला. उत्तम कांबळे यांची सचिवपदी, तर ला. संदीप मोरे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली असून, नूतन कार्यकारिणी मंडळाचा पदभार स्वीकारण्यात आला.
या दिमाखदार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभवजी खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर उपस्थित होते. त्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून एम.जे.एफ. ला. पराग पानवलकर (डिस्ट्रिक्ट चेअरमन ॲक्टिव्हिटी कॉन्टेस्ट) यांनी काम पाहिले.
यावेळी व्यासपीठावर एम.जे.एफ. ला. डॉ. विरेंद्र चिखले (माजी प्रांतपाल / मल्टीपल कौन्सिल सेक्रेटरी/ट्रेझरर), झोन चेअरमन ला. निलेश हेदुकर, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, भाजपा शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रहीम भाई सहीबोले आणि नॅशनल हेअर अँड ब्युटी ॲकॅडमीचे चेअरमन तुषार चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मागील वर्षाचे अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, खजिनदार ला. माणिक लोहार, कार्यक्रम प्रमुख ला. परेश चिखले, ला. ओम जाधव, रोहन विचारे, सुरेश चिकणे, मिलिंद तलाठी, डॉ. वेद तलाठी, ज्ञानेश्वर मुरकर, स्वप्निल नरळकर, सर्वेश पवार, ओवैस चौगुले यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी आपल्या भाषणातून क्लबच्या माध्यमातून जनसेवेचा वसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
