चिपळूण : सावर्डे येथील गार्गी फाउंडेशन या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने दहीवली येथील खाडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. लहान मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
फाउंडेशनतर्फे शाळेला फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट साहित्य, दोरी, लंगडी इ. खेळ साहित्य देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची गोडी लागण्यास हातभार लागणार आहे.
कार्यक्रमास गार्गी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. राहुल थोरात, सदस्य पाटील सर, शाळा समिती अध्यक्ष प्रदीप पाटील, सुजीत गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक जटाले सर, शिक्षिका किरण शिवडे मॅडम यांनी संस्थेचे आभार मानले.
गार्गी फाउंडेशनने याआधीही विविध शैक्षणिक मदत उपक्रम, आरोग्य तपासणी, महिला सक्षमीकरण, पर्यावरण जनजागृती असे उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणातच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मदत व्हावी, हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.
गार्गी फाउंडेशनचा शालोपयोगी उपक्रम; दहीवली शाळेला खेळ साहित्याचे वाटप

Leave a Comment