GRAMIN SEARCH BANNER

दापोलीतील इयत्ता सातवीतील हेरंब लोंढे या विद्यार्थ्याने केली अवकाश संशोधनात संभाव्य लघुग्रहाची नोंद

Gramin Varta
243 Views

दापोली-दापोलीतील विद्यार्थी हेरंब मुकुंद लोंढे (इयत्ता ७ वी) याने आंतरराष्ट्रीय Asteroid Search Campaign मध्ये सहभागी होत अवकाशातील दुर्बिणीच्या प्रतिमांचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्याने हालचाल करणाऱ्या एका संभाव्य लघुग्रहाची (Asteroid Candidate) नोंद केली. ही नोंद “L. Heramb – P12kFHS” या निरीक्षण कोडसह Preliminary Asteroid Detection म्हणून नोंदवली गेली आहे. या निरीक्षणाची पुढील वैज्ञानिक पडताळणी Minor Planet Center मार्फत होत असून ही संस्था International Astronomical Union अंतर्गत जगभरातील लघुग्रह शोधांची अधिकृत नोंद ठेवते.

हेरंब सध्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून आई डॉ. रेणू मुकुंद लोंढे या देखील पशुवैद्यक आहेत. कुटुंबाकडून मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व पाठबळ हेरंबला लाभत आहे. या यशामध्ये EsroMagica या संस्थेचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले आहे. हेरंबच्या या यशाबद्दल दापोली परिसरातील असंख्य पशुपालक शेतकरी तसेच खगोलप्रेमींमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. हेरंब याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3334389
Share This Article