GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: रत्नागिरी मिरजोळेतील तरुणीची आंबा घाटात हत्या, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Gramin Varta
62 Views

रत्नागिरी – प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील एका तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी, जो खंडाळा येथील रहिवासी आहे, त्याला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिरजोळे गावात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचे खंडाळा येथील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, पण त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याने वाद सुरू झाले.

प्राथमिक माहितीनुसार, याच वादातून संशयित प्रियकराने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी आंबा घाटाकडे प्रवास केला. याच निर्जन ठिकाणी तरुणाने तिचा  खून केला आणि तिचा मृतदेह तिथेच फेकून दिल्याची शक्यता आहे.

ही तरुणी १० दिवसांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना तरुणी आणि तिचा खंडाळा येथील प्रियकर यांच्यातील संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कठोर चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.

माहितीनुसार, स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तात्काळ आंबा घाटाकडे धाव घेतली आहे. तेथे मृतदेहाचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमसंबंधातील या दुखद अंतामुळे मिरजोळे आणि खंडाळा परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती लवकरच…

Total Visitor Counter

2651763
Share This Article