लांजाचे ज्येष्ठ उद्योजक अनंत शंकर साळवी यांचे आकस्मिक निधन; सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपले

Gramin Varta
386 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा शहरातील ज्येष्ठ उद्योजक, वेल्डिंग व्यवसायातील अग्रणी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व अनंत शंकर साळवी यांचे बुधवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लांजा शहरासह व्यापारी, सामाजिक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली.

आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी लांजा येथे वेल्डिंग व्यवसायाची सुरुवात करून सर्वसामान्यांना माफक दरात दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली. प्रामाणिकपणा, कष्ट आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात वेगळी ओळख निर्माण केली. अनेक मंदिरे तसेच सामाजिक उपक्रमांसाठी लागणारी वेल्डिंगची कामे त्यांनी कोणतेही मानधन न घेता करून दिली होती. त्यामुळे ते केवळ यशस्वी उद्योजक नव्हते, तर समाजासाठी सदैव धावून जाणारे उदार व्यक्तिमत्त्व म्हणूनही परिचित होते.

वेल्डिंग व्यवसायाबरोबरच त्यांनी साळवी रेस्टॉरंट अँड बार तसेच लॉजिंग व्यवसायही यशस्वीपणे उभारला. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार आणि समाजात मानाचे स्थान मिळवले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी ५.०० वाजता लांजा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने लांजा शहराने एक कष्टाळू उद्योजक, सेवाभावी नागरिक आणि अनेकांचा जिवलग मित्र गमावला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Total Visitors :
4820690
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *