मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हस्ते सत्कार
रत्नागिरी: शहरानजीक असलेल्या श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुपौर्णिमा निमित्ताने उत्साहात पार पडला. या परीक्षेत जागुष्टे प्रशालेचा हर्षवर्धन श्रीकांत पाटील याने जिल्हा गुणवत्ता यादीत १८वा क्रमांक, तर स्वस्तिक अरुण कांबळे याने तालुका गुणवत्ता यादीत ४था क्रमांक मिळवून शाळेचे, पालकांचे व गुरुजनांचे नाव उज्वल केले आहे.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, असे यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. असे ते म्हणाले.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला शिवाय गुरुपौर्णिमा देखील साजरी करण्यात आली.या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक झोरे व शिक्षकवृंदाच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.