विठापेठ-मलकापूर-अनुस्कुरा-साटवली-पावस राज्य महामार्गासाठी ३५० कोटी मंजूर

Gramin Varta
297 Views

प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू

राजापूर/ तुषार पाचलकर: विठापेठ-मलकापूर-अनुस्कुरा-साटवली-पावस या राज्य महामार्गासाठी आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांनी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सध्या या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.

प्राथमिक सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अंदाजपत्रक तयार करून या कामाची टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. सदर मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी अजून जवळपास एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा रस्ता मार्गी लागल्यामुळे या परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व वेगवान होणार आहे.

Total Visitors :
4590888
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *