अंतराळ विषयावरील जागतिक स्पर्धा परीक्षेत चिपळूणचा रुद्र खातू ठरला विश्वविजेता; ९९.६० टक्के गुणांसह पटकावला प्रथम क्रमांक

Gramin Varta
158 Views

चिपळूण: इस्त्रोमध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि दरवर्षी अंतराळ विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘STEM & Space’ या प्रतिष्ठित संस्थेच्या परीक्षेत चिपळूणचा सुपुत्र रुद्र मिनार खातू याने जगभरात प्रथम क्रमांक पटकावत विश्वविजेतेपद मिळवले आहे. इंडियन स्कूल वादी कबीर, मस्कत (ओमान) येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या रुद्र खातू याने या अतिशय स्पर्धात्मक परीक्षेत ९९.६० टक्के गुणांची उल्लेखनीय कमाई करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

जगभरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत रुद्रने उत्कृष्ट कामगिरी करत मिळवलेले हे यश चिपळूणसह संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ठरले आहे. रुद्र हा स्वामीभक्त दादा खातू यांचा नातू असून, त्याच्या या जागतिक पातळीवरील उज्ज्वल यशाबद्दल चिपळूणमधून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रुद्रच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी आयोजक संस्था ‘STEM & Space’ यांच्यावतीने २४ जुलै २०२६ रोजी पुणे येथे एका भव्य पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते रुद्र खातू याचा सन्मान करण्यात आला. त्याच्या या यशामुळे चिपळूण परिसराचा जागतिक पातळीवर सन्मान वाढला असून विविध क्षेत्रांमधून त्याच्यावर कौतुुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4841021
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *