शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या आफिया हरून आंबेडकर हिचे घवघवीत यश

Gramin Varta
82 Views

संगमेश्वर : नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेड बुद्रुक या विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थिनी आफिया हरून आंबेडकर हिने उल्लेखनीय यश संपादन करून शाळा, पालक आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

या यशामागे विद्यार्थिनीची मेहनत, नियमित अभ्यास, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. शाळेतील शिक्षकांनी नियोजनबद्ध सराव, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव, वैयक्तिक मार्गदर्शन आणि वेळोवेळी घेतलेल्या विशेष वर्गांमुळे विद्यार्थिनीला हे यश मिळविणे शक्य झाले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेल्या न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणखी एक पुरावा मानला जात आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आफिया हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यातही विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थिनी आफिया हरून आंबेडकर हिच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

Total Visitors :
4595374
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *