GRAMIN SEARCH BANNER

चाकरमान्यांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्यांचे उद्यापासून आरक्षण सुरू

चिपळूण मेमू ट्रेन सर्वसामान्यांसाठी अनारक्षित धावणार

मुंबई : गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकणासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग, कणकवली आदी भागांत या गाड्या धावतील. चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी 24 जुलै पासून आरक्षण सुरू करण्यात आले आहे. 10 स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तर अकरावी दिवा- चिपळूण मेमू एक्सप्रेस सर्वसामान्यांसाठी अनारक्षित 23 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 25 जुलै पासून आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

गाड्यांचे थांबे व डब्यांची रचना

बहुतेक गाड्या ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी व झाराप येथे थांबतील. काही गाड्यांना सिन्नधुर्ग, मडगाव व करमळी थांबेही आहेत.
गाड्यांमध्ये ३ टियर एसी, २ टियर एसी, स्लीपर, जनरल आणि SLR डबे यांचा समावेश आहे. काही गाड्यांमध्ये मेमू डबेही आहेत.

दैनंदिन आणि साप्ताहिक विशेष गाड्या

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर एकूण ११ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामध्ये दैनंदिन व साप्ताहिक गाड्यांचा समावेश असून खालीलप्रमाणे त्यांचा तपशील देण्यात आला आहे:

1. मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड (01151/01152)

मुंबईहून रात्री १२.२० वाजता सुटणार

सावंतवाडीत ४:२० वाजता पोहोचणार

परतीसाठी रोज ३:३५ वाजता सुटणार

2. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड (01171/01172)

एलटीटीहून रोज ०८:२० वाजता सुटणार

सावंतवाडी ९:०० वाजता

परतीसाठी रात्री ९:३५ वाजता

3. मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी (01153/01154)

रोज ११:३० वाजता सुटणार

रत्नागिरीसाठी ८:१० वाजता पोहोचणार

परतीसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:०० वाजता

4. मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी (01103/01104)

सायंकाळी ३:३० वाजता सुटणार

रात्री ०४:०० वाजता पोहोचणार

5. एलटीटी – सावंतवाडी (01167/01168)

रात्री ९:०० वाजता सुटणार
परतीसाठी ११:३५ वाजता सावंतवाडीतून

6. दिवा – चिपळूण मेमू विशेष (01155/01156)

दिवाहून सकाळी ०७:१५ वाजता

चिपळूणहून सायंकाळी ३:३० वाजता परतीसाठी

7. एलटीटी – मडगाव (01165/01166, 01185/01186)

मंगळवार व बुधवार (साप्ताहिक)

एलटीटीहून रात्री पावणे एक वाजता

मडगावला दुपारी २:३० वाजता

8. एलटीटी – सावंतवाडी (01129/01130)

सकाळी ०८:४५ वाजता एलटीटीहून सुटणार

रात्री १०:२० वाजता सावंतवाडीत पोहोचणार

परतीसाठी रात्री ११:२० वाजता

9. पुणे – रत्नागिरी (01445/01446, 01447/01448)

मंगळवार व शनिवार साप्ताहिक

पुणेहून रात्री 12.30 वाजता, रत्नागिरीला दुपारी ११:५० वाजता, परतीसाठी सायंकाळी सायंकाळी ५:५० वाजता

परतीसाठी गाड्यांचे आरक्षण २५ जुलै २०२५ पासून सर्व पीआरएस सेंटर, इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.

अधिक माहिती आणि वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Total Visitor Counter

2455919
Share This Article