ब्रेकिंग : १० आणि २० रुपयांच्या एक अब्ज पॉलिमर बँक नोटा आणण्यास सरकारची मंजुरी

Gramin Varta
184 Views

दिल्ली: केंद्र सरकारने 10 आणि 20 रुपयांच्या एक अब्ज पॉलिमर बँक नोटा आणण्यास मंजुरी दिली आहे. या दोन्ही मूल्यवर्गांच्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा जारी केल्या जातील, ज्यांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीवरून भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, 1934 च्या कलम 25 अंतर्गत सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला होता. केंद्र सरकारने फील्ड ट्रायलसाठी 10 आणि 20 रुपयांच्या एक अब्ज पॉलिमर बँक नोटा आणण्यास आपली मंजुरी दिली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रस्तावात फील्ड ट्रायलसाठी 10 रुपये आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर बँक नोटा आणणे आणि फील्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या दोन मूल्यवर्गांमध्ये पॉलिमर बँक नोटा नियमितपणे जारी करण्याची बाब नमूद करण्यात आली होती.

त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेनुसार या पॉलिमर बँक नोटा कागदी बँक नोटांसोबतच जारी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यांनी सांगितले की, आरबीआयने माहिती दिली आहे की खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे सध्या पॉलिमर बँक नोटा कधी आणल्या जातील किंवा त्यासाठी किती खर्च येईल, हे सांगणे शक्य नाही.

- Advertisement -
Total Visitors :
4681021
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *