रत्नागिरी: तालुक्यातील गोळप धनगरवाडी येथे विषारी द्रव प्राशन केल्याने एका नेपाळी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनोज थापा (45, रा. गोळप, मूळ रा. नेपाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज थापा याने 24 जुलै रोजी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून विषारी द्रव प्राशन केले होते. त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 29 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.