GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये साडेतीनशे नागरिकांची कर्करोग तपासणी

Gramin Varta
50 Views

मंडणगड: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मंडणगड पंचायत समिती, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय आणि डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.त्यातून साडेतीनशे नागरिकांची तपासणी करण्यात आली.

देव्हारे, म्हाप्रळ, कुंबळे, मंडणगड, पालवणी आणि पंदेरी अशा सहा ठिकाणी पाच दिवस चाललेल्या या विशेष उपक्रमात ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. टाटा हॉस्पिटलचे डॉ. वैभव चंद्रा यांच्यासह सहाय्यक डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांनी हे तपासणी शिबिर पार पाडले. तपासणीत २७० रुग्णांची तोंडाच्या कर्करोगासाठी, १७५ महिलांची स्तन कर्करोगासाठी तसेच १७५ महिलांची गर्भाशय व मुख कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. याशिवाय ४५ जणांची लॅब टेस्टही घेण्यात आली.

या उपक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मानसी पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी वामन मेंढे, तालुका आरोग्य कार्यालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले.

Total Visitor Counter

3388325
Share This Article