खेड : कळंबणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा गावचे प्रथम नागरिक भगवान साळुंके यांना सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा राज्यस्तरीय ‘सन क्रिस्टल गुणगौरव पुरस्कार’ नुकताच बारामती येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कळंबणी बुद्रुक गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भगवान साळुंके यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासह गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सरपंच म्हणून खेड तालुक्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताच्या विविध उपक्रमांना त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक क्षेत्रातील योगदान तसेच लोकहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भगवान साळुंके यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वीही त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली आहे.
बारामती येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात भगवान साळुंके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी कळंबणी बुद्रुक गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्ताराम येरापले तसेच भगवान साळुंके यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
भगवान साळुंके यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कळंबणी बुद्रुकसह संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही राज्यस्तरीय दखल ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
कळंबणी बुद्रुकचे सरपंच भगवान साळुंके यांना राज्यस्तरीय सन क्रिस्टल गुणगौरव पुरस्कार
Leave a Comment





