ओमळी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष कदम; व्हा. चेअरमनपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
9 Views

चिपळूण : तालुक्यातील ओमळी गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पत्रकार सुभाष कदम, तर व्हा. चेअरमनपदी माजी उपसभापती सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ओमळी सोसायटीच्या कार्यालयात बुधवार, दि. १९ ऑगस्ट 2026 रोजी सहाय्यक सहकारी संस्था निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी व्हरकट यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सुभाष कदम व सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सोसायटीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू झाली होती. यामध्ये सर्वसाधारण, महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच इतर प्रवर्गातून एकूण १३ संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर आज चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडही बिनविरोध झाली. यावेळी संचालक संतोष चव्हाण, चंद्रकांत भि. जाधव, राजाराम गायकर, सतीश कदम, नितीन सोमण, अशोक जाधव, चंद्रकांत सि. जाधव, श्रीराम रसाळ, सुभाष बांद्रे, अश्विनी साळुंखे, प्रमिला बांद्रे उपास्थित होते. 

निवडीनंतर उपस्थित संचालक व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित चेअरमन सुभाष कदम व व्हा. चेअरमन सुभाष जाधव यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवर, संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ : ओमळी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष कदम, तर व्हा. चेअरमनपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपस्थित संचालक व पदाधिकारी.

Total Visitors :
4730133
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *