लायन्स क्लब सावर्डे,आयडियल आयोजित मोफत मधुमेह तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ११० नागरिकांचा सहभाग

Gramin Varta
75 Views

चिपळूण / दिपक कारकर : बदलत्या जीवनशैली-मुळे मनुष्यास अनेक व्याधींना तोंड द्यावे लागत आहेत. फास्ट फूड, केमिकलयुक्त अन्न पदार्थ याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. धावपळीच्या जीवनात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही. त्यामुळे आजचा छोटासाचा आजार भविष्यात मोठे स्वरुप धारण करत असतो. त्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम हा प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी केल्यास वेळीच आजाराने निदान होऊ शकते. देशात सध्या मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होत आहेत. वेळीच उपचार केल्यास यावर आपण मात करु शकतो.

अशा समाज भावनेतून नुकताच मंगळवार दि.१८ ऑगस्ट २०२६ रोजी लायन्स क्लब सावर्डे,आयडीयल संस्थेच्या माध्यमातून चिपळूण तालूक्यातील वहाळ येथे डॉ.अजित गावकर यांच्या श्री.गणेश क्लिनिक मध्ये मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.

या शिबिरात तब्बल ११० नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये ५० जुने मधुमेही रुग्ण तर १५ नवीन मधुमेहाचे निदान झालेले रुग्ण होते.सर्वांनी मोफत तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचाराचा लाभ घेतला.

या शिबिरासाठी डॉ.मृणाल भुवड (MD,DNB) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ.लायन अजित गावकर आणि डॉ.लायन स्वाती गावकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ.मृणाल भुवड यांचा लायन्स क्लब सावर्डे आयडियलतर्फे भेटवस्तू व वृक्षरोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श संदेश देण्यात आला.

या संपूर्ण उपक्रमासाठी श्री गणेश क्लिनिकचे सर्व स्टाफ,कर्मचारी आणि अनमोल सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लायन्स क्लब सावर्डे,आयडियलतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.अजित गावकर म्हणाले आताच्या महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेत “सेवा हीच खरी मानवता ; आरोग्य हीच खरी संपत्ती ; आणि समाजासाठी केलेले प्रामाणिक कार्य हीच खरी लायन्सची ओळख आहे.ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Total Visitors :
4729919
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *