चिपळूण: जखमी गायीच्या बचावासाठी तरुणांची तत्परता; क्रेनच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू

Gramin Varta
73 Views

चिपळूण : गोवळकोट रोड येथील विसर्जन घाटावर आज सकाळी पाण्यात पडून गंभीर जखमी झालेल्या गायीला स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे वेळेत मदत मिळाली. पाण्यात पडल्याने गायीच्या पाठीला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले होते. त्यानंतर ती वेदनेने विव्हळत उघड्या उन्हात पडून होती.

दुपारच्या सुमारास मच्छी मार्केट पुलावरून जात असताना अयान मिथागिरी यांच्या निदर्शनास जखमी गाय आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मुशर्रफ पेशकर यांच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू केले. गायीला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आवश्यक मदतीसाठी निखिल किल्लीकर यांच्या माध्यमातून चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

माहिती मिळताच शुभम पिसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. गायीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी क्रेनची आवश्यकता असल्याने इक्बालभाई कच्छी यांच्या माध्यमातून क्रेन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या समन्वयातून जखमी गायीचे काळजीपूर्वक रेस्क्यू करण्यात आले.

अयान मिथागिरी, मुशर्रफ पेशकर, निखिल किल्लीकर, आरोग्य सभापती शुभम पिसे आणि इक्बालभाई कच्छी यांच्या तत्परतेमुळे जखमी गायीला वेळीच मदत मिळाली. मुक्या प्राण्याच्या वेदना ओळखून तरुणांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

Total Visitors :
4731377
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *