गुहागर दुर्गादेवी देवस्थानतर्फे ‘बेटी बचाव बेटी पढ़ाव’ मोहिमेअंतर्गत २२०० मुलींना मदत निधी वितरीत

Gramin Varta
45 Views

गुहागर : ‘बेटी बचाव बेटी पढ़ाव’ मोहिमेअंतर्गत दुर्गादेवी देवस्थानतर्फे गेली नऊ वर्षे मुलींसाठी प्रोत्साहनपर निधी दिला जात असून, यावर्षी तब्बल २ हजार २०० मुलींना मदत निधी देण्यात आला आहे. अशा प्रकारचे गंगेसारखे निर्मळ काम करणारे कोकणातील हे एकमेव देवस्थान असल्याचे ‘बेटी पढ़ाव बेटी बचावकडे’ राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके यांनी सांगितले.

देवस्थानतर्फे मंदिरामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘बेटी पढ़ाव बेटी बचावकडे’ कार्यक्रम सरकारने सुरू केल्यानंतर शंभर जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दुर्गादेवी देवस्थान कमिटीला माहिती दिल्यानंतर हा उपक्रम दरवर्षी सुरू करण्यात आला. याची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात वाढली असून, नगरपंचायतीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष असल्याने नगरपंचायतीनेही मुलींसाठी ठोस काम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे म्हणाले की, पुढील काळात या योजनेचे फलित म्हणून एक तरी मुलगी आयएएस, आयपीएस अशा मोठ्या पदांवर काम करताना दिशेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वेत गोखले यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष नीता मालप, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगरसेविका वैशाली मावळणकर, अनुषा भावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुयोग वैद्य, देवस्थान सचिव संतोष मावळणकर, गणेश भिडे, विक्रांत खरे, वल्लरी खरे, स्नेहा खरे, नगरसेविका विशाखा सोमण, मीरा घाडे, सुष्माना राहाटे, विदिशा दणदणे, श्रेया मोरे, स्वरा तेलगडे, दीप्ती सांगळे उपस्थित होते.

Total Visitors :
4750450
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *