संगमेश्वर बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित; भूमिगत उच्चदाबाच्या दोन्ही केबल फॉल्टी

Gramin Varta
65 Views

संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेतील वीजपुरवठ्यावर पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचे संकट ओढवले आहे. सोनवी महामार्ग पुलाखालून गेलेल्या भूमिगत उच्चदाबाच्या दोन केबलपैकी एक केबल सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास फॉल्टी झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच युद्धपातळीवर काम सुरू केले. फॉल्टी झालेली केबल बदलल्यानंतर दुसरी पर्यायी केबलही रात्री सुमारे १२ वाजता बदलून तिची ट्रायल घेण्यात आली. मात्र, ट्रायलदरम्यान दुसरी केबलदेखील फॉल्टी असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे संगमेश्वर बाजारपेठेला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राचा वीजपुरवठा सध्या बंद ठेवावा लागणार आहे. एकाच वेळी दोन्ही पर्यायी भूमिगत उच्चदाबाच्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बाजारपेठेतील वीजपुरवठा सुरळीत करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

दरम्यान, महावितरणच्या संगमेश्वर विभागाकडून वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू आहेत. सकाळी लवकर तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी, नागरिक तसेच व्यावसायिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल महावितरण संगमेश्वरकडून नागरिकांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

Total Visitors :
4756343
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *