नात्याला काळीमा! रायगडमध्ये पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर बापाकडून अत्याचार; माणगाव पोलिसांत पोक्सोसह गुन्हा दाखल

Gramin Varta
6 Views

रायगड: बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोटच्या ११ आणि १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर सख्ख्या बापानेच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑक्टोबर २०२४ ते जून २०२६ या कालावधीत म्हसळा तालुक्यातील पाभरा, तळा, माणगाव तसेच सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. पीडित मुलींनी या संदर्भात आपल्या आईकडे घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले.

मुलींच्या जबानीनंतर आईने तातडीने माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.

Total Visitors :
4755938
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *