देवरुख : चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्था व साऊ एकल महिला समितीच्यावतीने दिनांक 4 ऑगस्ट रोजी पंचायत समिती देवरुख छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे “विधवा व एकल महिला शिबिर व शैक्षणिक साहित्य वाटप” हा उपक्रम राबविण्यात आला प्रथम चक्रभेदी कार्यकारी मंडळाच्या श्रद्धा प्रसादे यांच्या मातोश्री सुनंदा मापुस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला सुमारे शम्भर महिला उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले संस्थेने नुकतेच सात विधवा व एकल महिलांना रोजगारासाठी टी स्टॉल शॉप जवळपास एक लाखाच्या वस्तू मोफत देण्यात यश मिळवले तसेच राष्ट्रसेवादल संचलित साने गुरुजी प्राथमिक शाळा पुणे ही महाराष्ट्रातील पहिली शिव्या मुक्त शाळा करण्यात यश मिळवले इत्यादी संस्थेची माहिती सांगून आज आपल्या समस्या अडचणी यांची नोंद व त्यावर चर्चा करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे आहे असे वैदेही सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते सरांनी रोजगारावर आपण जास्त भर दिला पाहिजे असे महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.विस्तार अधिकारी शिक्षण विभाग मा. यशवंत तावरे सर यांनी” सावंत म्याडम आम्हाला ट्रेनिंग द्यायला होत्या त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होत आहे हे बघून आनंद होत असल्याचे सांगितले. संस्थेला शुभेच्छा दिल्या.. त्यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना छत्री, गणवेष,दप्तर, रायटिंग पॅड,वह्या, कंपास, बॉटल इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. पस्तीस विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
चक्रभेदीच्या कार्यकारी मंडळात निवड झालेल्या संपदा राणा, गुलनार पकाली, शबाना खतीब,श्रद्धा प्रसादे, कविता काजरेकर यांचा शाल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.सर्व महिलांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्या अडचणी समस्या समजून घेऊन सर्व महिला मिळून मा.ना. आदिती तटकरे मंत्री महिला व बालकल्याण मंत्रालय यांना बालसंगोपनचे व संजय गांधी निराधार पेन्शनचे पैसे नियमित यावे. ज्यांनी अर्ज केले आहेत ते लवकर मंजूर करण्यात यावेत. अर्ज दिलेल्या तारखेपासून त्यांना लाभ मिळावा तसेच विधवा एकल महिलांच्या दाखल्यांसाठी एक कॅम्प घ्यावा व त्यांचे एकाच वेळी उत्पन्नाचा दाखला, राशनिंग कार्ड लवकरात लवकर मिळावे असे निवेदन तहसीलदार साहेबांना संस्थेचे कार्यकारी मंडळ व उपस्थित महिलांनी मिळून दिले.
संस्थेचे सल्लागार मा. रावसाहेब चौगुले, आश्लेषा इंगवले, प्रज्वल राऊत, वैदेही किरवे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला राष्ट्रवादी देवरुख शहर सरचिटणीस मा. गायत्री बने, शहराध्यक्ष मा. अक्षता सावंत उपस्थित होत्या.
पंचायत समिती देवरुखचे सहाय्यक गटविकास अधिकारी मा. विनोदकुमार शिंदे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी मा. डी. आर. कदम सर यांनी वेळेवर सभागृह उपलब्ध करून दिल्या बद्दल उपस्थित सर्व महिलांनी आभार मानले.