GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर दगडाने हल्ला

रत्नागिरी : शहरातील जेट एम. पाटणकर रेसिडेन्सी, स्टेट बँक कॉलनी, चर्मालय येथे पार्किंगच्या किरकोळ वादातून एका रिक्षाचालकावर दगडाने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ जून रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

फजल अब्दुल लतीफ गुहागरकर (वय ३९, रा. जेट एम. पाटणकर रेसिडेन्सी, स्टेट बँक कॉलनी, चर्मालय, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते त्यांची (एम.एच. ०८ ए.क्यु. ४५९०) रिक्षा चालवत घरी आले होते. त्यावेळी आरोपी शोएब आझाद मुकादम (वय ३५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांच्या दुकानाचे सामान घेऊन आलेला ट्रक इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर उभा होता. त्यामुळे फजल गुहागरकर यांना आपली रिक्षा पार्किंगमध्ये नेण्यास अडचण येत होती.

यावर फजल गुहागरकर यांनी शोएब मुकादम यांना “तुम्ही तुमच सामान घेऊन आलेला ट्रक रस्त्यातून बाजूला करा, मला रिक्षा आत घेऊन जाण्यास अडचण होत आहे,” असे सांगितले. याच गोष्टीचा राग शोएब मुकादम यांना आल्याने त्यांनी फजल गुहागरकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी तेथील एक दगड उचलून फजल गुहागरकर यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले.
या मारहाणीत फजल अब्दुल लतीफ गुहागरकर हे जखमी झाले आहेत. रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११ (१) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

2455622
Share This Article