GRAMIN SEARCH BANNER

खासगी बसमध्ये महिलेची छेडछाड काढल्याने बस पोलीस ठाण्यात!

Gramin Varta
11 Views

रत्नागिरी : खासगी बसमध्ये एका महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला. या घटनेनंतर बसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे बसचालकाने ती थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नेली.

पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली. मात्र, संबंधित महिलेने कोणतीही तक्रार दाखल केली नसल्यामुळे याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाऊ शकला नाही.

सदर बस सिंधुदुर्ग येथून मुंबईच्या दिशेने निघाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास सुरू असताना महिलेने बसमध्ये छेडछाड झाल्याची माहिती दिली. त्यामुळे बसमध्ये खळबळ उडाली.

घटनेनंतर बस रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या वेळी अनेक तास बस पोलीस ठाण्यात उभी राहिली होती. मात्र महिलेकडून लेखी तक्रार न दिल्यामुळे पुढील कारवाई न करता बस मुंबईकडे रवाना करण्यात आली.

Total Visitor Counter

2652433
Share This Article