GRAMIN SEARCH BANNER

गुहागर मनसेच्या जि.प.कोंडकारूळ उपतालुकाध्यक्षपदी प्रसाद विखारे तर कोंडकारूळ विभाग अध्यक्षपदी सचिन सैतवडेकर यांची नियुक्ती

Gramin Varta
125 Views

गुहागर/उदय दणदणे: गुहागर तालुका मनसेच्या जि. प.कोंडकारूळ उपतालुकाध्यक्षपदी  प्रसाद विखारे तर कोंडकारूळ विभाग अध्यक्षपदी सचिन सैतवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नूतन नियुक्त्या गुहागर मनसेसाठी तसेच जिल्हा परिषद गट कोंडकारूळ विभागात महत्वपूर्ण ठरणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक/अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रभावित होत पालशेत येथील प्रसाद विखारे पक्ष स्थापनेपासून गुहागर तालुक्यात मनसे पक्ष संघटनेचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत २८ सप्टेंबर २०२५ रोजी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते प्रसाद विखारे यांची जि.प.कोंडकारूळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

तर मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते पालशेत बारभाई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन सैतवडेकर कोंडकारूळ विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मनसे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर,गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्यासह असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते. कोंडाकारूळ विभागात सचिन सैतवडेकर यांच्या सारख्या पक्षनिष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिल्याने मनसे सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

2652089
Share This Article