दापोली: भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेच्या वैदिक वास्तुशास्त्र परीक्षेत डॉ. अनिल सावंत उत्तीर्ण

Gramin Varta
43 Views

दापोली (प्रतिनिधी): भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांच्या वतीने जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या वैदिक वास्तुशास्त्र (सीसीएफई) परीक्षेत दापोलीचे प्रसिद्ध ज्योतिष विशारद आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ डॉ. अनिल सहदेव सावंत यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करत परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे कौतुक होत आहे.

दादर (मुंबई) येथील गुरुकुल हॉलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रमोहन रानडे यांच्या शुभहस्ते डॉ. सावंत यांना अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या अभ्यासक्रमादरम्यान डॉ. सावंत यांना संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रा. आनंद राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दीक्षांत व सत्कार समारंभाला संस्थेचे प्राचार्य डॉ. आनंद राणे, प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रमोहन रानडे, केसरी टूर्सच्या सौ. सुनीता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक वैदिक वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करून डॉ. सावंत यांनी मिळवलेल्या या यशामुळे दापोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक तसेच ज्योतिष-वास्तू क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4810944
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *