आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार शुभारंभ; अपूर्वाताई सामंत यांची प्रमुख उपस्थिती
राजापूर (तुषार पाचलकर) : राजापूर तालुक्यातील पूर्व विभागाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचल येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या **‘हॉटेल निखिल लॉजिंग अँड बोर्डिंग’**चे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या तथा युवासेना कार्यकारिणी सदस्या अपूर्वाताई सामंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पाचल गावचे उपसरपंच, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच हॉटेल मैत्री बार अँड रेस्टॉरंटचे मालक आणि शिवसेनेचे ओणी-पाचल विभागप्रमुख आत्माराम सुतार यांच्या संकल्पनेतून हे सुसज्ज लॉजिंग उभारण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन व्यवस्थापक तथा श्री राधाकृष्ण मित्र मंडळ, दिवाळची वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागातील पाचल ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावांतील नागरिक विविध दैनंदिन व्यवहारांसाठी पाचल बाजारपेठेत येत असतात. त्याचबरोबर मुंबई-पुणे मार्गे कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही या मार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे पाचल बाजारपेठेचे व्यावसायिक आणि प्रवासी केंद्र म्हणून महत्त्व अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत येणाऱ्या नागरिक, व्यापारी तसेच प्रवाशांच्या निवासाची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने सुसज्ज लॉजिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाचलसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत अशा प्रकारची सुविधा आवश्यक होती. त्यामुळे ग्राहक आणि प्रवाशांना चांगल्या निवासाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘निखिल लॉजिंग अँड बोर्डिंग’ सुरू करण्यात आल्याचे आत्माराम सुतार यांनी सांगितले. या लॉजिंगच्या उद्घाटनाला आमदार किरण सामंत यांची उपस्थिती लाभत असल्याचा आनंद असून, हा क्षण आपण आपले भाग्य समजत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्यास शिवसेना तालुकाध्यक्ष दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, पाचलचे माजी सरपंच अशोक सक्रे, माजी उपसरपंच किशोर नारकर, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, ओझरचे माजी सरपंच तथा उद्योजक इब्राहिम लांजेकर, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, शिवसेना विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहन गोसावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पाचलमध्ये ‘निखिल लॉजिंग अँड बोर्डिंग’चे १२ सप्टेंबरला उद्घाटन
Leave a Comment






