किल्ले प्रचितगड श्रमदान मोहीम पुढाकार
संगमेश्वर: हर हर महादेव !! जय भवानी !! अशी आरोळी ऐकली की आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात, आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आणि वंदनीय व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य कथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो.शिवरायांच्या शौऱ्याचं आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचं प्रतिक असणाऱ्या गड-किल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला आस्था असते.छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे.गडांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात विशेष औत्सुक्य असतं.गडकिल्ल्यांची ही उत्सुकता पूर्ण केली आहे संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मलदेवाडी येथील अल्पेश सोलकर या तरुणाने.महाराष्ट्रातील एकूण किल्ल्यांपैकी २०० गडकिल्ले भटकंती त्याने पूर्ण केली आहे.त्यामध्ये महाराष्ट्र मधील सर्वोच्च ऊंचीचे किल्ले आणि शिखरे यांचा समावेश आहे.
गडकिल्ले भटकंती करताना त्याने एक, दोन दिवसीय तसेच तीन दिवसीय भटकंती मोहीम केलेली आहे..यामध्ये जसे धुळे जळगाव मधील किल्ले लळिंग, भामेर,चौगाव,पारोळा इ.किल्ले भटकंती, पुणे मल्हारगड, ढवळगड, वाफगाव, इंदुरी,चाकण किल्ला इ.,सांगली सदाशिवगड,विलासगड, मच्छिंद्रगड, बानूरगड किल्ले भटकंती, म्हणजेच योग्य नियोजन करून त्या भागातील बहुसंख्य किल्ले करता येतात.
निसर्गाच्या सानिध्यात जावे तसेच इतिहास भूगोल प्रत्यक्षात अनुभवावा हाच उद्देश आहे.आपला फिटनेस ही राखून ठेवावा अधिक लक्ष केंद्रित केल्यानंतर प्रत्येक रविवार कसा सह्याद्रीत घालवता येईल, नोकरी सोबतच भटकंती करता येईल असे नियोजन आखले गेले.गडकिल्ले भटकंती करताना आलेले चांगले वाईट अनुभवावरून मेडिकल प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केलेले आहे.
आपल्या पूर्वजांचा हा वारसा किती भव्य आहे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला किमान ह्यांच्या कथा अभिमानाने सांगू शकतो, म्हणूंन हा सगळा उपद्व्याप. आपण, आता असं भव्य काही निर्माण करण्याच्या लायकीचे नाही, किमान, त्याची जपणूक, लोकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता निर्माण करणे आणि आपलाच इतिहास अधिक जवळून जाणून घ्यायला आपल्याला किल्ल्यांवर जायलाच हवं.
सोबतच अल्पेश सोलकर यांचा गडकिल्ले संवर्धन मध्येही पुढाकार असतो.आताच्या तरुण पिढीने गडकिल्ले संवर्धन करावे, आपला इतिहास जपावा या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यात स्थित किल्ले प्रचितगडाचे संवर्धनाचे काम हातात घेतले आहे.या कामाच्या दोन मोहिमा सुद्धा झाल्या आहेत..पहिल्या मोहिमेत गडाचा मुख्य दरवाजा मोकळा करण्यात आला तसेच दुसऱ्या मोहीम बुरुज,गडावरील मंदिर परिसर,पाणी टाके इत्यादी गोष्टी साफसफाई करण्यात आली.
संगमरत्न फाउंडेशन या संस्थेची करून तरुण वयात असलेली समाजसेवीची आवड स्वस्त बसू देत नव्हती.याच संस्थेमार्फत शैक्षणिक विभाग अंतर्गत विविध शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप,शालेय केंद्र,तालुकास्तरीय स्पर्धा, दुर्गम भागात ,डोंगर दऱ्या वाडी वस्तीत असणाऱ्या शाळा यांना भेटी शाळा उपयुक्त वस्तू वाटप,इत्यादी सोबतच समाज उपयोगी कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबीर मुंबई दादर येथे,आणि गडकिल्ले वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
येणाऱ्या काळात प्रचितगड पायथा गावे, पंचक्रोशीतील गावे,यांना दुर्गसंवर्धन ओळख,आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सादरीकरण करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे.गडकिल्ले,ऐतहासिक स्थळे भटकंती सोबत ती अभ्यासली सुद्धा पाहिजेत म्हणून ऐतहासिक घाटवाटा , स्थळे,समाधी स्थळे,मंदिरे,लेणी ,किल्ले यांच्या अभ्यास मोहिमा घडविण्याचा मानस संगमरत्न फाउंडेशनचा आहे.आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोचवायचा असेल तर सह्याद्रीत,रानावनात, गडकिल्ल्यावर तर गेलेच पाहिजे.याची जनजागृती करण्याचे काम सुद्धा अल्पेश करत आहे.