GRAMIN SEARCH BANNER

ऑक्टोबरपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, पावसाळी वेळापत्रक रद्द होणार

मुंबई : पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका असतो. तसेच मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेमार्गावरील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे या मार्गावर सध्या पावसाळी वेळापत्रक लागू असून ते २० ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक असल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल असेल.त्यानंतर २१ लागू होणार करण्यात येणार आहे.

पावसाळी वेळापत्रकानुसार वीर ते उडुपी या ६४६ किमी मार्गावर वेगमर्यादा लागू असते. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे गाड्याचा वेग कमी असतो. दरवर्षी कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात येते. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली. त्यामुळे यंदा १० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू जंक्शन (दैनिक)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेस (दैनिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी एक्स्प्रेस (साप्ताहिक)

दादर टर्मिनस ते सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (दैनिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन (आठवड्यातून ४ दिवस)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन वंदे भारत एक्स्प्रेस (आठवड्यातून ६ दिवस)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस (दैनिक)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन तेजस एक्स्प्रेस

दिवा ते सावंतवाडी एक्स्प्रेस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन मांडवी एक्स्प्रेस (दैनिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस (दैनिक)

दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर (दैनिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (दैनिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस (द्विसाप्ताहिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम (द्विसाप्ताहिक)

लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन वातानुकूलित दुरंतो एक्सप्रेस (द्विसाप्ताहिक)

दादर ते तिरुनेलवेली एक्सप्रेस (साप्ताहिक)

Total Visitor Counter

2474878
Share This Article