GRAMIN SEARCH BANNER

कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस घालणार थैमान, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार 29 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

कोकण विभाग :
राज्यातील कोकण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. 40-50 किमी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाट पाऊस थैमान घालेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर इतर काही भागांमध्ये यलो अलर् जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड या ठिकाणी मध्यम ते जोराचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Total Visitor Counter

2475195
Share This Article