लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्प शासनाच्या ताब्यात द्या; आमदार प्रमोद जठार यांची मागणी

Gramin Varta
121 Views

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील सामूहिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) संदर्भात भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रकल्प शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर टीका करत जठार यांनी लोटे एमआयडीसी परिसरातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णयासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

लोटे परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला जाईल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पाहणी दौऱ्यावेळी वैभव खेडेकर, सतीश मोरे, संजय आखाडे, रहीम सहिबोल, ऋषिकेश मोरे, भालचंद्र उर्फ नंदू साळवी, मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, निलेश बामणे, शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले आणि पप्पू नीमनकर उपस्थित होते.

Total Visitors :
4576798
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *