MHT CET पीसीएम परीक्षेत रोटरी स्कूलची दमदार कामगिरी; 72 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल

Gramin Varta
72 Views

खेड : एमएचटी-सीईटी (MHT CET) पीसीएम गटाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पीसीएम गटातील तब्बल 72 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण मिळविले असून 116 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण प्राप्त केले आहेत.

यंदाच्या निकालात कु. पार्थ चव्हाण याने 99.82 पर्सेनटाईल मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ कु. करण कांबळे याने 99.30 तर कु. पवन देवकाते याने 99.15 पर्सेनटाईल गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळविले. तसेच कु. शर्विन पडवळ (98.95), कु. जुहेद नागुठणे (98.74), कु. सोहम घाडी (98.73), कु. तनुष सुर्वे (98.54), कु. निहार जोशी (98.51), कु. सार्थक देवरुखकर (98.44), कु. हर्षद पाटील (98.26), कु. श्रुती चव्हाण (98.23), कु. साईराज हटकर (98.14), कु. किंजल मोकारिया (97.93), कु. वेदांत पंडुळे (97.88), कु. यश पडवळ (97.80), कु. सोहम खोपटकर (97.79), कु. राज घडशी (97.61), कु. श्रेयस पवार (97.56), कु. आर्य शिर्के (97.43), कु. आर्यन दबेकर (97.42), कु. इमाद खोत (97.29), कु. आर्या नाईक (97.16), कु. चैतन्य सळये (97.10), कु. पार्थ दोशी (97.09), कु. मानस पालकर (96.96) आणि कु. हुमायरा खतिब (96.69) यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी क्षेत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे. संपूर्ण कोकण विभागात भरघोस यश मिळविणाऱ्या शाळांमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलने आपले वेगळेपण पुन्हा अधोरेखित केले आहे.

या यशामागे फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गशिक्षकांचे परिश्रम तसेच परीक्षा विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :
4820521
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *