दापोली :  नारगोली येथे एसटी आणि कारचा अपघात, परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या कारला एसटीची धडक

Gramin Varta
256 Views

दापोली : तालुक्यातील नारगोली येथे गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास खेड-दापोली मार्गावरील एसटी बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात खेड येथील विधी महाविद्यालयात परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारला एसटी बसची धडक बसली.

अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील विद्यार्थी तसेच एसटी बसमधील प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची मोठी दुर्घटना टळल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून संबंधित यंत्रणांकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *