चिपळूण: मुरादपूर येथे उंदीर मारण्याच्या औषधामुळे विवाहितेचा मृत्यू

Gramin Varta
321 Views

चिपळूण : शहरातील मुरादपूर भागात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहितेचा उंदीर मारण्याचे विषारी औषध पोटात गेल्यामुळे उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश मंदिराजवळील सायली बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अक्षता सुमित दुरगुळे असे मृत महिलेचे नाव आहे. अक्षता यांनी उंदीर मारण्याचे ‘रेटॉल’ नावाचे विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.

त्यानंतर, त्यांच्या पतीने त्यांना २७ मे रोजी उपचारासाठी ‘लाईफ केअर’ रुग्णालयात दाखल केले होते, तेथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचार सुरू असताना ३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती अक्षता यांच्या आई अनुराधा अनिल गुजर यांनी २६ मे रोजी चिपळूण पोलिसांना दिली होती. याप्रकरणी २२ जून रोजी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्यांनी हे औषध नेमके का प्राशन केले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेमुळे मुरादपूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4576798
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *