चिपळूण-दिवा दरम्यान धावणार दर रविवारी विशेष मेमू गाडी

Gramin Varta
438 Views

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने चिपळूण ते दिवा या दरम्यान एक विशेष मेमू अनारक्षित गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा रविवार, दिनांक २८ जून रोजी दोन्ही दिशांनी उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण-दिवा मेमू विशेष गाडी २८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी त्याच रात्री ११.२५ वाजता दिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असून, आठ डब्यांच्या मेमू रचनेची आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी ही गाडी अंजणी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करणजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिटे, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पंचानंद आणि निलजे अशा विविध स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष गाडीमुळे सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Total Visitors :
4820522
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *