देवरुखमध्ये १० ते १२ जुलै जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा

Gramin Varta
117 Views

देवरूख (प्रतिनिधी) : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने व संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लबच्या संयुक्त विद्यमाने २४ वी सब-जुनियर व ज्युनिअर व ९ वी कॅडेट,२४ वी सिनियर क्युरोगी व १३ वी सब-जुनियर,९ वी कॅडेट,१३ वी ज्युनिअर व सिनियर पुमसे तायक्वांदो स्पर्धा सन २०२६ ओमेगा गार्डन हॉल सावरकर चौक देवरुख या ठिकाणी दिनांक १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान संपन्न होत असून जिल्ह्यातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी संगेमश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेले नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब व लायन्स क्लब संगमेश्वर चे खेळाडू सहभागी होणार असून या खेळाडूंची निवड चाचणी नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब दळवी वृंदावन कंपाऊंड देवरुख या ठिकाणी क्लब अध्यक्षा तालुका अकॅडमी उपाध्यक्षा सौ. स्मिता लाड, क्लब उपाध्यक्षा ॲड. पुनम चव्हाण, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,पालक प्रतिनिधी आदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ही स्पर्धा चांगल्या रीतने संपन्न होण्यासाठी अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम यांचे विशेष योगदान लाभत असुन यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा चांगल्या रीतीने संपन्न होण्यासाठी क्लब व तालुक्याचे पदाधिकारी व प्रशिक्षक हे सर्व विशेष मेहनत घेत आहेत.
   
स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे

शौर्य माळी, शुभ्रा माळी,सई संसारे, जीविता देशपांडे, निकुंज घडशी, तनुष पेडणेकर,अनुराग यादव,दुर्गा मोघे, लक्ष्मी मोघे, नक्षत्रा शिंदे, अभिज्ञा राणे, ऋतिक कांगणे, ईशान भागवत,सोमांश सावंत, आर्य भोसले, अर्णव बंडबे, आरुष जाधव, वेदांत मसुरकर, शौर्य मिर्गल,शर्विल कांगणे, तनिष्का कांगणे, रीतीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, हिरन्मयी भागवत, मिहिका लाड, शौर्या वाघमोडे, संस्कृती कांगणे,पूर्वा रहाटे, गंधार रेवडेकर, अफजान फुलारी, शौर्य पेडणेकर,साहिल जागुष्टे, अधिराज कदम, यशराज कटके, पृथ्वीराज कटके, आदित्य चिपळूणकर, शौर्य लोध,गंधर्व शेट्ये,ओम घाग ,प्रथमेश शेट्ये,मंथन चव्हाण ,संस्कृती चव्हाण ,अर्णव सुर्वे ,अन्वय कोळवणकर ,पियुष रहाटे ,वेद पटेल ,अवनी भिंगार्डे ,अंश पवार ,ओमराजे महाडिक ,सोहम चव्हाण ,अजिंक्य शिंदे, समृद्धी घडशी, मयुरी राऊत, वैदेही भस्मे, सुमित पवार, आशिष रसाळ, राहुल चव्हाण
   
या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमी अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने तालुक्याचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख शहराच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, देवरुख शहराचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये व जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कर्रा, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्त्ये,तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, लायन्स तायक्वांदो क्लब अध्यक्ष दिलीप रहाटे,क्लब सदस्या स्वाती नारकर, रुपाली कदम,अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, अनुजा नार्वेकर,सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, संकेत मापुस्कर,सानिका प्रसादे, गायत्री शिंदे,सिद्धी केदारी, वेदांत गिडीये आदींनी शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :
4576507
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *