कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ वृद्ध व्यक्तीची रेल्वेखाली आत्महत्या

Gramin Varta
354 Views

चिपळूण: चिपळूण शहरानजीक असलेल्या कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वृद्ध व्यक्तीने नेत्रावती एक्स्प्रेससमोर झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली. या भीषण घटनेत मृतदेहाचे तुकडे होऊन मान व धड वेगळे झाल्यामुळे मृताची ओळख पटवणे कठीण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा वृद्ध व्यक्ती हाफ शर्ट आणि बर्म्युडा परिधान करून काही वेळ रेल्वे फाटकाजवळ बसून होता आणि नेत्रावती एक्स्प्रेस जवळ येताच त्यांनी अचानक रेल्वेखाली उडी घेतली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पुढील ओळख पटवण्यासाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या व्यक्तीबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4576135
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *