देवरुखात सलग तीन घरफोड्या करणाऱ्या चोरांच्या मागावर विशेष पथके

Gramin Varta
362 Views

देवरुख: शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्दळीच्या आणि गजबजलेल्या परिसरातील ही घरे चोरट्यांनी लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंद घरांचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटे व इतर सामानाची उचकापाचक करत मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला.

या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, तिन्ही घरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. चोरीला गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा आणि रोख रकमेचा नेमका तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी चोरीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली असून, या धाडसी चोरीच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांनी घरे बंद ठेवताना अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Total Visitors :
4833741
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *