लांजा : बेनी खुर्द बौद्धवाडी येथे ४२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
428 Views

लांजा : तालुक्यातील  एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी, १४ जुलै रोजी रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष विजय धनावडे (वय ४२, रा. बेनी खुर्द बौद्धवाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री संतोष धनावडे हे आपल्या राहत्या घरी असताना त्यांनी घरातील लोखंडी बाराला कापडी ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत फाशीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :
4820446
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *