उद्योजक रवींद्र सामंत यांच्या माणुसकीचे दर्शन; अपघातग्रस्त पोलीस पाटलांना कृत्रिम पाय आणि तीनचाकी वाहनाची भेट

Gramin Varta
1360 Views

सिकंदर फरास/दाभोळे : उद्योजक रवींद्र सामंत यांचे दाभोळे गावाबद्दल असलेले जिव्हाळ्याचे आणि अतूट नाते पुन्हा एकदा दिसून आले आहे.दाभोळे गावचे पोलिस पाटील यशवंत सुकम यांना अपघातामुळे आलेल्या शारीरिक व्यंग्यातून सावरून पुन्हा जोमाने कामाला लागता यावे यासाठी रवींद्र सामंत यांनी त्यांना कृत्रिम पाय आणि तीनचाकी वाहनाची मदत देऊन आज माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

जानेवारी महिन्यात दाभोळे गावातील पोलिस पाटील यशवंत सुकम यांचा गंभीर अपघात झाला होता.या दुर्दैवी अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. या शारीरिक नुकसानामुळे त्यांना आपली दैनंदिन कामे करणे कठीण झाले होते.ही बाब समजताच उद्योजक रवींद्र सामंत यांनी तत्काळ पुढाकार घेतला.सुकम यांना पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे जोमाने आपले कार्य करता यावे यासाठी त्यांनी त्यांना कृत्रिम पाय देण्याचा निर्णय घेतला.तसेच त्यांना प्रवासासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्वरित तीनचाकी वाहन उपलब्ध करून दिले.

रवींद्र सामंत यांच्या या मदतीमुळे यशवंत सुकम आणि ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.या मदत कार्याबद्दल सुकम यांनी आमदार किरण सामंत आणि उद्योजक रवींद्र सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.

यावेळी विलास भाई बेर्डे,पंकज देवळेकर, शुभम गांधी, काशिनाथ सकपाळ,सागर भिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे रत्नागिरी येथून हे तीनचाकी वाहन दाभोळे येथे आणण्यासाठी अनिकेत देवळेकर यांनी आपला मौल्यवान वेळ देत ही महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या या सहकार्याचेही सर्वांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Total Visitors :
4576148
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *