मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शे कारचा भीषण अपघात; एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालकासह प्रवाशाचे टळले मोठे प्राणसंकट

Gramin Varta
112 Views

मुंबई: मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात महागड्या पोर्शे कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे, मात्र कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालकासह प्रवाशाचे प्राण वाचले आणि सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही पोर्शे कार कोस्टल रोडवर अतिवेगाने धावत होती आणि याच वेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली, तसेच ही धडक इतकी जोरदार होती की आलिशान स्पोर्ट्स कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या एअरबॅग यंत्रणेने योग्य वेळी काम केल्यामुळे कारमधील दोन्ही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या आठ मिनिटांत बचावकार्य सुरू करण्यात आले आणि कारमधील दोन्ही व्यक्तींना सुखरूप बाहेर काढल्यानंतर अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आली, ज्यामुळे काही काळासाठी कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहतूक सुरळीत केली.

टॅप टर्बो इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे फिल्ड इंचार्ज रवी गुप्ता यांनी सांगितले की, कोस्टल रोडवर विशेषतः शनिवार-रविवारी अनेक वाहनचालक अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवतात आणि पावसामुळे रस्ता ओला असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते. दरम्यान, या अपघातामागे अतिवेग कारणीभूत आहे की वाहनातील कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, याचा सखोल तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4576146
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *