दापोली : केळशी खाडी पुलाच्या बांधकामासाठी साहित्य वाहून नेणारा सुमारे ४५ टन वजनाचा अवजड ट्रेलर पलटी

Gramin Varta
89 Views

दापोली: केळशी खाडी पुलाच्या बांधकामासाठी साहित्य वाहून नेणारा सुमारे ४५ टन वजनाचा अवजड ट्रेलर दापोली तालुक्यातील लोणवडी येथे रस्त्याच्या कडेला कलंडल्याची घटना घडली.
केळशी खाडी पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरू असून, लोणवडी परिसरातील अरुंद आणि वळणदार रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या एका बाजूला कलंडला.

या अपघातानंतर काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, मार्गावरील ट्रेलर हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वारंवार होणारी अवजड वाहतूक आणि परिसरातील अरुंद रस्ते यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *