गोवळकोटमध्ये दरड कोसळून घराला धोका; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची तातडीची पाहणी

Gramin Varta
141 Views

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजनांच्या सूचना

चिपळूण : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील गोवळकोट परिसरात दरड कोसळून एका घराला धोका निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

स्थानिक नगरसेवक उदय जुवळे यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष सकपाळ यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ हाती घेण्याचे निर्देशही नगराध्यक्षांनी दिले.

या पाहणीवेळी बांधकाम सभापती कपिल शिर्के, माजी नगरसेविका सुषमा कासेकर, शिवसेनेचे पदाधिकारी दयानंद जुवळे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Total Visitors :
4602486
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *