रत्नागिरीच्या माजी सिव्हिल सर्जनचे काळे धंदे उघड; तब्बल 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Gramin Varta
913 Views

कोल्हापूर : आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एका माजी सिव्हिल सर्जनने बेकायदेशीर गर्भपाताचे मोठे रॅकेट चालवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, करवीर पोलिसांनी कदमवाडी परिसरातील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना प्रत्यक्ष गर्भपाताची प्रक्रिया सुरू असतानाच रंगेहात पकडले आहे. रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे ‘सिव्हिल सर्जन’ म्हणून तसेच मुंबईतील प्रसिद्ध सेंट जॉर्ज रुग्णालयात साहाय्यक अधीक्षक आणि आरोग्य उपसंचालक यांसारख्या अत्यंत जबाबदार उच्च पदस्थ पदांवरून निवृत्त झालेल्या डॉ. गायकवाड यांनी कायद्याची पायमल्ली करून हे काळे धंदा केंद्र चालवल्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

करवीर पोलिसांनी सापळा रचून अचानक केलेल्या या धडक कारवाईत डॉ. गायकवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अचानक प्रकृती बिघडल्याचा बनाव केल्याची चर्चा असून, प्राथमिक चौकशीदरम्यान त्यांनी आतापर्यंत तब्बल ३०० हून अधिक महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गंभीर संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकरणात आणखी कोणकोणते एजंट, मध्यस्थ किंवा वैद्यकीय कर्मचारी सहभागी आहेत, याचा सखोल तपास सध्या करवीर पोलिसांकडून केला जात आहे.

Total Visitors :
4609997
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *