महाराष्ट्र प्री अपर प्रायमरी शिष्यवृत्ती परीक्षेत एसीबी इंटरनेशनल स्कूल, कापसाळची विद्यार्थिनी चमकली

Gramin Varta
8 Views

तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात १६ वा क्रमांक; शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब

चिपळूण :  महाराष्ट्र शासनातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या प्री अपर प्रायमरी शिष्यवृत्ती परीक्षेत एसीबी इंटरनेशनल स्कूल, कापसाळच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

सीबीएसई अभ्यासक्रमातून परीक्षेला बसलेल्या कु. सौम्य बिपिन दाभोळकर हिने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात १६ वा क्रमांक मिळवत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.या यशस्वी विद्यार्थिनीचे, तिच्या पालकांचे तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक, स्कूल मॅनेजमेंट व सर्व शिक्षकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही विद्यार्थिनीने शैक्षणिक क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करून शाळेचे व पालकांचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.या यशामुळे एसीबी इंटरनेशनल स्कूल, कापसाळच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4610031
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *