रत्नागिरी: गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर २४६ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.या विशेष गाड्यांचे आरक्षण १ ऑगस्ट २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
विशेष गाड्यांमध्ये १८४ आरक्षित विशेष गाड्या आणि ६२ अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे. विशेष सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६ फेऱ्या, पुणे येथून १० फेऱ्या आणि दिवा येथून ६२ अनारक्षित मेमू फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटी-सावंतवाडी रोड, सीएसएमटी-रत्नागिरी, एलटीटी-सावंतवाडी रोड, एलटीटी-रत्नागिरी, एलटीटी-मडगाव, पुणे-रत्नागिरी तसेच दिवा-खेड आणि दिवा-चिपळूण या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. काही गाड्या दररोज, काही साप्ताहिक, द्वि-साप्ताहिक तर काही आठवड्यातील निवडक दिवशी चालविण्यात येणार आहेत.
विशेष आरक्षित गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. १ ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक ०११५३, ०१४४५, ०११६७ आणि ०१४४७, २ ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक ०११६५ आणि ०११८५, तर ३ ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक ०११०३, ०११२९, ०११५१, ०११७१ आणि ०११३१ यांचे आरक्षण सुरू होणार आहे.
अनारक्षित मेमू गाड्यांची तिकिटे यूटीएस प्रणाली तसेच रेलवन (RailOne) ॲपद्वारे उपलब्ध होणार असून, गाड्यांच्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर आणि NTES ॲपवर पाहता येणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
गणपतीसाठी कोकण रेल्वेवरील २४६ विशेष गाड्यांचे आजपासून आरक्षण
Leave a Comment






