सावर्डेतील लाचखोर मंडल अधिकारी अनिल जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Gramin Varta
186 Views

चिपळूण : सावर्डे येथे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मंडल अधिकारी अनिल दिलीप जाधव याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे त्याला सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले, असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Total Visitors :
4666955
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *