खेड बसस्थानकातील रसवंतीगृहात मद्यप्राशन; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Gramin Varta
73 Views

खेड : येथील एसटी बसस्थानक परिसरातील एका रसवंतीगृहात पडदा लावून काहीजण राजरोजसपणे मद्यप्राशन करत असल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा प्रवाशांच्या निदर्शनास आला. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एसटी बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी, विद्यार्थी आणि महिलांची ये-जा असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी रसवंतीगृहात पडदा लावून मद्यप्राशन केले जात असल्याचे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. माजी आमदार संजय कदम यांनी संबंधितांची कानउघडणी करत पोलिसांनि या प्रकाराबाबत जाब विचारला. दरम्यान, खेड एसटी बसस्थानकातील पोलीस मदत कक्षात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस मदत कक्ष असूनही, तिथे कर्मचारी नसल्याने बसस्थानक परिसरात गैरप्रकारांना आळा घालण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बसस्थानक परिसरात सातत्याने प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खेड बसस्थानक परिसरात चोवीस तास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, तसेच पोलीस मदत कक्ष नियमितपणे सुरू ठेवावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Total Visitors :
4667323
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *