चिपळुण : गजमल पिंपळी बुद्रुक येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २० हजारांची रोकड लंपास

Gramin Varta
4 Views

चिपळूण : तालुक्यातील गजमल पिंपळी बुद्रुक येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान गजमल पिंपळी बुद्रुक येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी व कुलूप कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

या चोरीमध्ये ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे ४२.१६५ तोळे सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे ७४.८०० तोळे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

याप्रकरणी विलास रघुनाथ गजमल (वय ६१) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. हा गुन्हा ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.४४ वाजता दाखल करण्यात आला.

Total Visitors :
4667689
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *