जगबुडी नदीत मॅगीचा कंटेनर कोसळल्याची दुर्घटना; वीस तासांच्या थरारक शोधमोहिमेनंतर चालकाचा मृतदेह बाहेर

Gramin Varta
473 Views

खेड : जगबुडी नदीत मॅगीचा कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात तब्बल वीस तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. बुधवारी बावीस जुलै रोजी सायंकाळी साडेहा वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीवरील उंच पुलावरून मॅगीने भरलेला हा कंटेनर थेट नदीत कोसळला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून चालकाचा शोध घेण्यासाठी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले.

मात्र मुसळधार पाऊस, नदीतील पाण्याचा प्रचंड वेग आणि खोल पाणी यामुळे या बचाव मोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सर्व यंत्रणांनी हार न मानता आपले काम सुरू ठेवले. अखेर गुरुवारी तेवीस जुलै रोजी दुपारी, तब्बल वीस तासांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर चालकाचा मृतदेह कंटेनरमध्ये अडकलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला.

या खडतर बचाव मोहिमेमध्ये खेड पोलीस प्रशासन, एनडीआरएफची टीम, खेड नगरपालिकेचे अग्निशमक दल, मदत ग्रुप खेड तसेच विसर्जन कट्टा या स्वयंसेवी पथकांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावत संयुक्तपणे सहभाग घेतला. या दुर्घटनेत मृत पावलेल्या चालकाचा मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर कारवाईसाठी खेड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून, हा अपघात नेमका कशामुळे घडला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सध्या कसून तपास सुरू आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827201
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *